अफगाणिस्तानात १७ ठार

कंदाहार – कंदाहार शहरातील हमामखान्यावर शुक्रवारी दुपारी आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये १७ जण ठार झाले असून २३ जण जखमी झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये पोलिसांचा समावेश आहे. शुक्रवारच्या नमाजापूर्वी आंघोळीसाठी भाविक जमलेले असताना हमामखान्यावरच दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला. दरम्यान दक्षिण अफगाणिस्तानात रस्त्याच्या बाजूला पेरुन ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्याने एक सैनिक मृत्यूमुखी पडल्याची माहिती नाटोकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment