राज्य लोकसेवा आयोगाच्या १३ व्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

मुंबई -अर्थव्यवस्थेचा वेगाने होणारा विकास, प्रशासकीय क्षेत्रातील घोडदौड, विविध क्षेत्रात होणारे बदल, नवनवीन संधी आणि त्यानिमित्ताने समोर ठाकणारी आव्हाने या सगळ्यांचा विचार करुन देशाला कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची फार मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. ही गरज केंद्रीय आणि राज्यांच्या लोकसेवा आयोगांना भागवावी लागणार असल्याने त्यादृष्टीने कार्यपध्दतीत बदल करण्याची गरज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

देशातील राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या तेराव्या राष्ट*ीय परिषदेचे आयोजन ७ ते ९ जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करुन झाले. प्रारंभी महाराष्ट* लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मधुकर कोकाटे यांनी स्वागत करुन परिषदेच्या आयोजनामागचा हेतू स्पष्ट केला. अलिकडे नागरिकांमध्ये हक्क आणि अधिकारांबाबत जागृती वाढत आहे. यामागे सरकारने केलेल्या अनेक कायद्यांची पार्श्वभूमी आहे. माहितीचा अधिकार, रोजगारच्या हक्काचा कायदा, शिक्षणाच्या हक्का कायदा, येऊ घातलेला अन्न सुरक्षा कायदा अशा प्रकारच्या कायद्यांमुळे जनजागृती वाढत आहे. प्रशासनातील पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढले आहे. नव्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी नव्याने नागरी सेवेत प्रवेश करु पाहणार्‍या युवक -युवतींना मोठी संधी प्राप्त होत आहे. लोकसेवा आयोगांनी अशा प्रतिभावन तरुणांना सेवेत येण्यासाठी आपली कार्यप्रणाली आवश्यकतेनुसार सुधारुन घ्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, सामाजिक न्यायाच्या अंगाने विकास झाला पाहिजे. त्याचबरोबर विकासाचा भौगोलिक समतोल साधला गेला पाहिजे. पर्यावरणाचे संरक्षण, जागतिक तपमानवाढ, कर्बवायूंचे उत्सर्जन अशा अनेक गंभीर समस्या जागतिक स्तरावर भेडसावत आहेत. यामुळे फयान, अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अशा सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्या तोडीचे प्रशासकीय मनुष्यबळ आवश्यक आहे. यासाठी विविध राज्याच्या लोकसेवा आयोगाने एकमेकांच्या कार्यपध्दतीचा अभ्यास करावा. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात लोकसेवा आयोगाने ऑनलाईन अर्जप्रणाली सुरु केली आहे. यामुळे उमेदवारांना अर्ज भरण्याची सोपी पध्दत उपलब्ध झाली आहे. आयोगाने आपल्या कार्यपध्दतीत अनेक सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. प्रशासनात नवी तरुण पिढी येत आहे. तिच्याकडून नक्कीच आशादायक काही घडेल असे चित्र आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आयोगाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉ. डी. पी. अग्रवाल तसेच आंध्रप्रदेश लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष वाय. वेंकटरामन रेड्डी यांनी मनोगत व्यक्त केले. परिषदेमुळे विविध राज्यातील कार्यपध्दतीतील गोष्टींची देवाणघेवाण होईल. योग्य व्यक्तींची, योग्यवेळी आणि योग्य ठिकाणी निवड होण्याच्या प्रक्रियेत लोकसेवा आयोगाला आपल्या कार्यपध्दतीत आवश्यक बदल करावे असे अग्रवाल यांनी सांगितले. परिषदेस राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाढ, मुंबई महापालिकेचे आयुक्त सुबोधकुमार उपस्थित होते. शेवटी महाराष्ट* लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. येडेकर यांनी आभार मानले.

Leave a Comment