मुंबई : वरळीत जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया

मुंबई वरळी येथे पाणीपुरवठा करण्यात येणारी ५७ इंचाची जलवाहिनी शुक्रवारी सकाळी अचानक फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले. शिवाय वरळी परिसरात होणार्‍या पाणी पुरवठ्यावरही त्याचा परिणाम झाला. प्राप्त माहितीनुसार सेंच्युरी बाजार, जुने पोस्ट कार्यालय, वरळी येथे एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे.    याच ठिकाणी महापालिकेची ५७ इंचाची जुनी जलवाहिनी आहे. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सदर जलवाहिनी अचानक फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले. सदर जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पालिकेने हाती घेतले असून रात्री उशीरापर्यंत हे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती सदर पालिका विभागाचे सहाय्यक आयुक्त नारायण पै यांनी दिली.