जनरल वॉर्डपेक्षा आयसीयूमध्ये कोरोनाचा सर्वाधिक धोका; चीनचे धक्कादायक संशोधन


बीजिंग : जगभरातील कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या आरोग्यसेवकांनाही कोरोनाची लागण झाली असून चीनमध्ये झालेल्या एका संशोधनात रुग्णालयातील जनरल वॉर्डपेक्षा आयसीयूत कोरोनाचा सर्वात जास्त धोका असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भातील संशोधन बीजिंग अकॅडमी ऑफ मिलिटरी मेडिकल सायन्सेस आणि वुहानच्या हुओशेनशान हॉस्पिटलने केला असून संशोधन अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने हे प्रसिद्ध केले आहे. तर यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातील विविध संशोधकांनी नमुने घेतले. त्यात त्यांना असे दिसून आले की, जनरल वॉर्डपेक्षा आयसीयूमधील सर्वात जास्त नमुने कोरोना पॉझिटिव्ह होते. आयसीयूमधील 43.5% नमुने कोरोना पॉझिटिव्ह आहेत, तर जनरल वॉर्डमधील फक्त 7.9 टक्के नमुने कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्याचबरोबर इतर भागाच्या तुलनेत जमिनीवर सर्वात जास्त कोरोनाचे विषाणू असल्याचे दिसले. हा व्हायरस डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांच्या चपलांमार्फत पसरत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चपलांचे सोल्सच्या निम्म्याहून अधिक नमुन्यांवर व्हायरस सापडला आहे.

Leave a Comment