कोरोना प्रतिबंधक लसीवरील पहिली चाचणी नापास, आरोग्य संघटनेचे स्पष्टीकरण


मुंबई : कोरोना या जीवघेण्या व्हायरसने संपूर्ण जगभरात मागील दोन-तीन महिन्यांपासून अक्षरशः थैमान घातले असून सर्वच देश या संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. असे असले तरी जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात दररोज लक्षणीय वाढ होत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील सर्वच देश प्रतिबंधक लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कोरोना व्हायरसला लमाम घालणाऱ्या पहिल्या लसीची चाचणी अपयशी ठरली असून ही प्रतिबंधक लस वैद्यकिय चाचणी दरम्यान कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

इतर माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, कोरोना प्रतिबंधक लसीची गिलीड (Gilead) कंपनीने निर्मिती केली होती. पण ही लस चीनमध्ये झालेल्या वैद्यकिय चाचणीत यशस्वी झाली नाही. रिपोर्टनुसार गिलीड कंपनाची एन्टी व्हायरल रेमडेसीव्हीर (Remdesivir) ही लस कोरोना सारख्या धोकादायक विषाणूवर मात करण्यास अयशस्वी ठरली आहे.

दरम्यान, गिलीड कंपनीकडून जागतिक आरोग्य संघटनने दिलेला अहवाल पुर्ण नसल्याचा दावा करण्यात आला आहे. संघटनेकडून सादर करण्यात आलेला अहवाल पूर्ण नाही. वैद्यकिय चाचणीसाठी चीनमध्ये अधिक लोक नसल्यामुळे ही चाचणी अद्याप पुर्ण झाली नसल्याची प्रतिक्रिया गिलीड कंपनीने दिली आहे.

Leave a Comment