कोरोना : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आयएएस अधिकाऱ्याने बनवला ‘को-बॉट’

झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात कोरोनाशी लढण्यासाठी एक रोबॉट तयार करण्यात आला आहे. हा रोबॉट कोरोनाग्रस्ताच्या रुममध्ये जाऊन औषधे आणि जेवण देईल. याचे नाव कॉ-बॉट ठेवण्यात आले आहे. चक्रधरधर येथील कोव्हिड-19 स्पेशल हॉस्पिटलमध्ये हा को-बॉट लाँच करण्यात आला. याला जिल्ह्याचे डीडीसी आदित्य रंजन यांनी स्वतः तयार केले आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी असे हे पहिलेच उपकरण आहे. हा रोबॉट स्वयंचलित आहे. कोणाचीही मदत न घेता रुग्णाच्या खोलीत जेवण आणि औषधे देऊ शकतो. सोबतच रुग्णाच्या तक्रारी डॉक्टरांपर्यंत पोहचवेल.

या रोबॉटला तयार करणारे आयएएस अधिकारी आदित्य रंजन यांनी सांगितले की, यामुळे कोरोनाग्रस्तांशी कर्मचाऱ्यांचा संपर्क येणार नाही. कर्मचारी स्वतःला संक्रमणापासून वाचवू शकतील. सोबतच पीपीई किटचा वापर देखील कमी होईल.

रंजन यांनी सांगितले की, हे टू वे कम्युनिकेशन आहे. आवाजाद्वारे रुग्णांना जेवण, पाणी आणि हात सॅनिटायझ करायला सांगतो. यात एक माइक देखील आहे, ज्याद्वारे रुग्ण आपल्या तक्रारी सांगू शकतात.

चीनचे रोबो नर्स जगभरात प्रसिद्ध आहेत. तेथूनच रंजन यांना या रोबॉटची कल्पना सुचली. सध्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त नाही. मात्र सुरक्षेचा उपाय म्हणून हा अविष्कार करण्यात आला आहे. रुग्ण वाढल्यास अधिक को-बॉट तयार केले जातील.

Leave a Comment