लॉकडाऊन : गुगल पेद्वारे करा या सेवांचे ऑनलाईन पेमेंट

लॉकडाऊनच्या काळात डिजिटल वॉलेट गुगल पे चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गुगल पे मुळे घरातून बाहेर न पडता तेथे पेमेंट करत आहे. याशिवाय युजर्सला ऑनलाईन पेमेंट केल्याने रिवॉर्ड देखील मिळत आहे. तुम्ही घरी बसल्या बसल्या गुगल पे द्वारे अनेक सेवांचे पेमेंट्स करू शकता, जेणेकरून तुम्हाला बाहेर जाण्याची गरज भासणार नाही.

मोबाईल रिचार्ज –

तुम्ही गुगल पे द्वारे कुटुंबातील सदस्य, मित्रांच्या मोबाईलवर रिचार्ज करू शकता. यासाठी तुम्ही अ‍ॅपमध्ये गेल्यावर न्यू पेमेंट पर्याय निवडून सहज मोबाईल रिचार्ज करू शकता.

डीटीएच आणि वीजेचे बिल –

गुगल पे च्या माध्यमातून तुम्ही सहज डीटीएच, इंटरनेट आणि वीजेचे बिल भरू शकता. तुम्हाला ज्या कंपनीचे बिल भरायचे आहे, ती कंपनी निवडून सहज बिल भरता येईल.

जवळील मेडिकल शॉप आणि किराणा सामानाचे पेमेंट –

तुम्ही गुगल पे च्या माध्यमातून जवळील स्टोरमधून औषधे अथवा घरातील सामान मागू शकता. याचे पेमेंट करण्यासाठी तुमच्याकडे दुकानदाराचा गुगल पे ला लिंक असलेले मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे.

अ‍ॅमेझॉन आणि बिग बास्केटवरून मागवलेल्या सामानाचे पेमेंट –

गुगल पे वरून तुम्ही अ‍ॅमेझॉन, बिग बास्केट आणि ग्रोफर्सवरून मागवलेल्या सामानाचे पेमेंट करू शकता. यासाठी तुम्ही यूपीआय आयडीचा उपयोग करू शकता. ही आयडी तुम्हाला अ‍ॅपच्या प्रोफाईलमध्ये मिळेल.

कोरोनाशी लढण्यासाठी फंड –

जर तुम्ही कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी फंड देऊ इच्छित असाल तर गुगल पे चा वापर करू शकता. यात तुम्हाला अनेक पर्याय मिळतील.

Leave a Comment