अमेरिकेतील 50 राज्यांत कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे आपत्ती कायदा लागू


वॉशिंग्टन : महासत्ता म्हणून ओळख असणाऱ्या अमेरिकेच्या इतिहासात देशभरातील 50 राज्यांमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय आपत्ती कायदा लागू करण्यात आला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे आपत्ती कायदा लागू करण्यात आला आहे. कोरोनाने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला असतानाच कोरोनाचे अमेरिका जणू नवे केंद्र बनले आहे. काही लाखांमध्ये अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या असून या आजाराने आतापर्यंत 22 हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.

याबाबतची माहिती देण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केले असून त्यांनी आपल्या ट्विटमध्ये इतिहासात पहिल्यांदाच देशातील 50 राज्यांमध्ये संपूर्णपणे आपत्ती कायदा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून कधीच न पाहिलेल्या शुत्रूशी युद्ध सुरू आहे आणि विजय नक्कीच आपला होणार, असे म्हटले आहे.

कोरोना व्हायरसमुळे बेहाल झालेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारताला धमकी दिली होती. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन (hydroxychloroquine) औषधाच्या निर्यातीवरील बंदी भारताने हटवली नाही तर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो, असे ट्रम्प म्हणाले होते. परंतु, भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन अमेरिकेला पुरवल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले होते. यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट करून पंतप्रधान मोदींचे आभार मानले होते. तसेच त्यांनी ट्विटमध्ये भारत-अमेरिका यांच्यातील मैत्रीचाही उल्लेख केला होता.

Leave a Comment