पुढच्या 3आठवड्यात पारले जी करणार 3 कोटी बिस्किट पुडयांचे वाटप


मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. या घोषनेनंतर हातावरती पोट असणारे अनेक मजूर चिंताग्रस्त झाले आहेत. घराबाहेर पडले नाही तर पोट कसे भरणार? असा प्रश्न अनेक मजूर आणि रस्त्यांवर राहणाऱ्यांना पडत आहे. पण पार्ले कंपनी या लोकांसाठी धावून आली आहे. पुढच्या 3 आठवड्यात पार्ले कंपनी 3 कोटी बिस्किट पुड्यांचे वाटप करणार असल्याचे वृत्त आहे.

रस्त्यांवर राहणारे किंवा हातावरती पोट असणारे नागरिक यांच्यापर्यंत लॉकडाऊन दरम्यान अन्न पोहचावे या उद्देशाने पार्ले कंपनीने ही घोषणा केली. पार्ले कंपनी प्रत्येकी एक आठवड्यात 1 कोटी बिस्किट पुड्यांची वाटप करणार आहे. देशात पुढचे 3 आठवडे लॉकडाऊन असणार आहे. दरम्यान, देशातील नागरिक या लॉकडाऊनला सकारात्मक प्रतिसादही देत आहेत. त्यानंतर अनेक कंपन्यांही परिस्थितीचे गांभीर्य जाणून मदतीचा हात पुढे करत आहेत.

Leave a Comment