
मुंबई – कोरोनाचा वाढता संसर्ग आणि फैलाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संचारबंदी घोषित केली आहे. त्याचबरोबर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास बंदी घातलेली आहे. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य तसेच इतर आवश्यक सेवा सुरु राहतील. पण ते वगळून पूर्ण संचारबंदी असेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय ; संपूर्ण राज्यात संचारबंदी
खाजगी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून आवश्यकता असल्यास चालक अधिक दोन जण, रिक्षामध्ये चालक अधिक एक जण प्रवास करायला परवानगी दिलेली आहे. दरम्यान, कालच्या कर्फ्यूनंतर लोकांनी आज पुन्हा एकदा गर्दी करायला सुरूवात केली होती. त्यानंतर आज राज्य शासनाने संचारबंदीचा कठोर निर्णय घेतला. आता ही संचारबंदी 31 मार्चपर्यंत लागू असणार आहे.
