केरळच्या एका हॉस्टिपटलमधून कोरोना व्हायरसच्या टेस्ट न करता पळून गेलेल्या अमेरिकन जोडप्याला पकडण्यात आले आहे. या दांपत्यामध्ये कोरोना व्हायरसंबंधी लक्षण दिसले होते. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते व कोरोना संबंधी चाचण्या करण्यास सांगण्यात आले होते.
कोरोना : ते अमेरिकन जोडपे सापडले
मात्र हे जोडपे विना चाचण्या करताच केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील हॉस्पिटलमधून डॉक्टरांना न सांगता निघून गेले होते. या जोडप्याला कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आले असून, त्यांना आयसोलेशनमध्ये (वेगळे) ठेवण्यात आले आहे.
केरळमध्ये एका इटालियन नागरिकासह तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून, आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 19 वर पोहचली आहे.
