कोरोनाचे 5 संशयित नागपूरच्या हॉस्पिटलमधून पळाले

नागपूरमधून कोरोना व्हायरसचे 5 संशयित रुग्ण हॉस्पिटलमधून पळून गेल्याची घटना समोर आली आहे. या रुग्णांमध्ये कोरोनाचे लक्षण आढल्यानंतर त्यांना नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले होते.

या घटनेची माहिती देत एसआय सचिन सुर्यवंशी यांनी सांगितले की कोरोनाचे 5 रुग्ण संशयित होते. त्यातील एकाचा रिपोर्ट नेगेटिव्ह आला होता. तर 4 जणांचा रिपोर्ट बाकी होता. ते सर्व नाश्ता करण्यासाठी गेले होते. त्यांचे म्हणणे होते की त्यांना कोरोनाच्या रुग्णांसोबत ठेवण्यात येऊ नये. या रुग्णांना पकडून हॉस्पिटलमध्ये आणले जाईल.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, काल कोरोना व्हायरसचे अहमदनगर आणि मुंबई येथून दोन पॉजिटिव्ह प्रकरण समोर आले आहेत. राज्यातील कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 19 झाली आहे.

Leave a Comment