
हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांचे मानधन त्याची चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ त्यानंतर त्याच्या कारकिर्दीचा आणि अभिनयचा आलेख पाहून वाढवले जाते. त्यातच बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने कोट्यावधीचे मानधन घेऊन विक्रम मोडला आहे. या अभिनेत्याने एका स्मार्टफोनच्या जाहिरातीसाठी तब्बल सात कोटी रुपये मानधन घेतले आहे. तीन ते पाच दिवस या जाहिरातीचे चित्रीकरण होणार असल्याने, त्याने प्रत्येक दिवसागणिक सात कोटी रुपये मानधन घेतले आहे.
एका जाहिरातीसाठी भाईजानने घेतले विक्रमी मानधन
हा अभिनेता आहे बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान. आपला दबदबा बॉलीवूडमध्ये निर्माण केल्यानंतर आता जाहिरातविश्वातही सलमान वरचढ ठरत आहे. त्याने नुकतीच स्मार्टफोनच्या जाहिरातीची ऑफर स्वीकारली आहे. त्याला त्या जाहिरातीसाठी प्रत्येक दिवसाला सात कोटी रुपये मानधन देण्यात येत आहे. एखाद्या सेलिब्रिटीला जाहिरातीसाठी दिली गेलेली ही सर्वाधिक रक्कम आहे.
सलमान खान फक्त याच ब्रँडच्या जाहिरातीसाठी नव्हे तर इतर कंपनींच्या जाहिरातींसाठी सुद्धा सर्वाधिक मानधन घेतो. सलमानला एवढे मानधन बॉलीवूडमध्ये असलेल्या स्टारडममुळेच मिळत आहे. जाहिरातीसाठी कलाकाराला त्यांच्या लोकप्रियतेनुसार मानधन दिले जाते.
