माहिती लीक न होण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप लिंक्सला असे करा रिसेट

भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे 40 कोटींपेक्षा अधिक युजर्स आहेत. काही दिवसांपुर्वी 4 हजारांपेक्षा अधिक ग्रुप इन्वाइट लिंक्स गुगल सर्चमध्ये आढळल्या होत्या. युजर्सच्या रिपोर्टनंतर गुगलने हा डेटाबेस हटवला. मात्र व्हॉट्सअ‍ॅ ग्रुप इन्वाइट लिंक क्रिएट करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

इन्वाइट लिंक वापरून कोणीही ग्रुपमध्ये ज्वाइन्ड होणार नाही, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. यामुळे तुमची खाजगी माहिती सुरक्षित राहते. इन्वाइट लिंक सार्वजनिक झाल्यास कोणीही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये समावेश होऊ शकते. त्यामुळे अशा लिंक्सला कसे रिसेट करता येईल, याविषयी काही टिप्स जाणून घेऊया.

कोणत्याही ग्रुप इन्वाइट लिंकला रिसेट करण्यासाठी तुम्ही त्या ग्रुपचे अ‍ॅडमिन असणे आवश्यक आहे. जर तुम्ही अ‍ॅडमिन असाल तर ग्रुप इंफो सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही लिंक रिसेट करू शकता.

यासाठी ग्रुप इंफो सेटिंग्समध्ये जाऊन इन्वाइट टू ग्रुप वाया लिंक पर्यायावर क्लिक करावे. यानंतर तुम्हाला लिंक रिसेट करण्याचा पर्याय मिळेल. याद्वारे तुम्ही जुन्या इन्वाइट लिंकला डिसेबल करून नवीन लिंक जनरेट करू शकाल. यामुळे जुन्या इन्वाइट लिंकद्वारे कोणीही ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. लिंकद्वारे युजर्सला ग्रुपमध्ये जोडण्या ऐवजी मॅन्युअली कोणत्याही युजर्सला ग्रुपमध्ये जोडणे सुरक्षित असते.

Leave a Comment