या जर्मन महिलेने अनोख्या पद्धतीने साफ केले केरळमधील बीच

मागील 25 वर्षांपासून केरळ फिरायला येणाऱ्या जर्मन पर्यटक गेब्रियल ओलेस्लेगर यांनी समुद्रकिनारा साफ करण्यासाठी एक उपाय शोधला आहे. गेब्रियल यांनी सांगितले की, मी मागील 25 वर्षांपासून कोवलम येथे येत आहे. त्यामुळे येथील स्थानिक लोक ओळखतात. एवढ्या वर्षात येथे वेगाने बदल होताना पाहिले. येथील वाढता कचरा कमी करण्यासाठी अभियान सुरू केले. यात स्थानिक लोकांनी देखील सहभाग घेतला.

गेब्रियल यांचे बर्लिन येथे एक आर्ट स्टुडिओ आहे. त्यांनी समुद्रकिनारी जमा केलेल्या कचऱ्यांपासून वस्तू तयार करत त्याचे प्रदर्शन भरवले आहे. यामध्ये फिशिंग बोटचे तुकडे, प्लास्टिक बाटली आणि कंटेनरसारख्या गोष्टींचा समावेश आहे.

त्यांनी सांगितले की, स्थानिक लोकांनी कचऱ्यावर माझ्याकडे निदान मागितले, तेव्हा मी त्वरित तयार झाले. एका विद्यार्थ्याने मला रिसायकल्ड करणाऱ्या इनसिनेरेटरबद्दल सांगितले. इनसिनेरेटर एक कचरा जाळणारी भट्टी आहे. कोरियन जर्मन टेक्नोलॉजीवर आधारित या मशीनमध्ये कचरा जाळल्याने प्रदुषण होत नाही. त्यानंतर मी जर्मनीत परतल्यानंतर कोवलमध्ये इनसिनेरेटर लावण्याची योजना तयार केली.

गेब्रियल यांना वाटते की, या प्रयत्नामुळे कोवलम देशभरात एक मॉडेल समुद्रकिनारा ठरेल. त्यांनी सांगितले की, आम्ही गुंतवणूकदारंच्या शोधात आहोत. जर्मनीत परतल्यावर यावर काम करता येईल.