आता तुमच्या पोर्शेवर उमटवा तुमचा ‘ठसा’

पोर्शे कंपनी ही आपल्या स्टाईलिश आणि वेगवान कारसाठी ओळखली जाते. मात्र आता कंपनी आपल्यी पोर्शे 911 या स्पोर्ट्स कारसाठी एक खास कस्टमायझेशन पर्याय दिला आहे.

कंपनीने माहिती दिली आहे की, आता पोर्श 911 वर ग्राहकांना आपल्या बोटाचा ठसा कारच्या बोनेटवर उमटवता येणार आहे. थोडक्यात, कंपनीने इनोव्हेटिव्ह डायरेक्ट प्रिंटिंग मेथड तयार केली असून, याद्वारे गाडीवर बोटाचा ठसा उमटवला जाईल. ग्राहकांना कार व हटके कल्पनेद्वारे स्वतःला एक्सप्रेस करता येईल व करण्याचा देखील संधी मिळेल.

Image Credited – hindustantimes

कंपनीचे वॉईस प्रेसिडेंट (इंडिव्ह्यूजवायलेझशन आणि क्लासिक) अ‍ॅलेक्झँडर फॅबिग म्हणाले की, पोर्शेच्या ग्राहकांसाठी स्वतःचे वेगळे असे व्यक्तीमत्व खूप महत्त्वाचे आहे आणि स्वतःच्या फिंगरप्रिंट पेक्षा दुसरे खाजगी काय असू शकते.

Image Credited – hindustantimes

जर्मनीमधील काही सेंटरमध्ये ही सेवा कंपनीमार्फत दिली जात आहे. तीन तंत्रज्ञानाद्वारे ही प्रक्रिया पार पडते, यामध्ये रोबॉट टेक्नोलॉजी (कंट्रोल, सेंसर, प्रोग्रामिंग), अ‍ॅप्लिकेशन टेक्नोलॉजी (प्रिंट हेड, ग्राफिक हँडलिंग) आणि पेंट टेक्नोलॉजी (अ‍ॅप्लिकेशन प्रोसेस, पेंट). ही सुविधा जगभरातील आपल्या सेंटर्समध्ये कधी देण्यात येईल, याबाबत पोर्शेने अद्याप काहीही माहिती दिलेली नाही.

Leave a Comment