
पुणे -आज छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होत आहे. राज्यभरातून असंख्य शिवभक्त यासाठी ढोल-ताशांच्या वाद्याच्या गजरात मशाल पेटवत शिवनेरी गडावर दाखल झाले आहेत. किल्ल्यावर होणाऱ्या उत्सवाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हेही उपस्थित राहणार आहेत.
किल्ले शिवनेरीवर साजरा होत आहे शिवजन्मोत्सव
प्रशासनाच्यावतीने जयंती उत्सव साजरा होत असताना, चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. शिवभक्त या परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित होत असून, ढोल-ताशांच्या गजरात व तुतारीच्या निनादात शिवगर्जना दिली जात आहे. प्रशासन व शिवभक्त शिवनेरी गडावर साजरा होणारा शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी एकत्र येऊन नियोजन करत आहेत.
