पाणी म्हणजे जीवन, असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मनुष्याच्या शरीरात 50 ते 60 टक्के पाणी असते. आरोग्यासाठी पाणी हे अतिशय म्हत्त्वाचे असते, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र तुम्हाला जर कोणी सांगितले की त्याने गेली 1 वर्षांपासून पाणीच पिलेले नाही तर ? तुमचा त्यावर विश्वासच बसणार नाही. मात्र इंडोनेशियामधील बाली येथील एका महिलेने खरचं मागील 1 वर्षांपासून पाणीच पिलेले नाही.
35 वर्षीय या महिलेचे नाव सोफी पार्तिक असून, त्या एक न्यूट्रिशन कोच आणि योगा शिक्षिका आहेत. सोफी ‘ड्राय फास्टिंग’वर असतात. त्या एक थेंब देखील पाणी पित नाहीत. मात्र जिंवत राहण्यासाठी त्या नारळ पाणी, फळे आणि ज्यूसद्वारे गरजेचे लिक्विड घेतात.
सोफी दररोज 13 ते 14 तास ड्राय फास्टिंग करतात. त्यांचा दावा आहे की, त्या आपल्या शरीराला फळ, भाज्या, ज्यूस आणि नारळ पाणीद्वारे सर्व पोषक तत्व देण्यास सक्षम आहेत. त्यांनी वर्षाभरापुर्वी ड्राय फास्टिंगची सुरुवात केली होती. यामुळे सांधे दुखी, डोळ्यांची सूज, फूड एलर्जी, खराब त्वचा आणि पाचन सारख्या समस्या चांगल्या झाल्याचा त्यांचा दावा आहे.
सोफी यांनी सांगितले की, त्यांच्या चेहऱ्यावर आणि गुडघ्यांवर सूज असे. त्या खूपच आजारी दिसत असे. डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी सोफीला काहीच आजार नसल्याचे सांगितले. एका मित्राच्या सल्ल्यावरून त्यांनी ड्राय फास्टिंग करण्यास सुरुवात केली. याची सुरूवात करण्याआधी तिने खूप संशोधन केले.
सोफीनुसार, बाटली बंद आणि नळाचे पाणी पिल्याने किडनी ओव्हरवर्क होते. ज्यामुळे शरीरातील सर्व पोषक तत्व बाहेर पडतात. तुम्हाला हायड्रेड राहण्यासाठी पाण्याची गरज नाही, हे केवळ तुम्हाला फुगलेले दर्शवते. तुम्ही जेव्हा ड्राय फास्टिंग करता, त्यावेळी लक्षात येते की तुम्हाला पाण्याची गरजच नाही.
सोफी यांना विना लिक्विड 10 दिवस घालवायचे आहेत. सोफी सर्वांनाच ड्राय फास्टिंग करण्याचा सल्ला देत नाहीत. लोकांना त्यांचे म्हणणे आहे की, जर ड्राय फास्टिंग करायचे असेल तर केवळ फळ आणि भाज्या खाण्यापासून करावी.