सध्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत 200 पेक्षा अधिक जणांना या व्हायरसमुळे प्राण गमवावे लागले असून, 8 हजार पेक्षा अधिक जणांना याची लागण झाली आहे. मात्र काही लोक असे आहेत, ज्या या भयंकर आजाराला एक बिअरशी जोडत आहेत. याचा खुलासा गुगल ट्रेंडमुळे झाला आहे.
गुगल ट्रेंडमधून समोर आले आहे की लोक कोरोना बिअर व्हायरस गुगलवर खूप सर्च करत आहेत. लोक कोरोना व्हायरस आणि मॅक्सिकोचा प्रसिद्ध बिअर ब्रँड ‘कोरोना’मध्ये गोंधळून गेले आहेत. ‘कोरोना बिअर व्हायरस’ सर्च करण्यामध्ये पुर्व यूरोपमधील देश एस्टोनिया सर्वात पुढे आहे.
Global search interest for “coronavirus symptoms” has spiked +1,050% this week. 😷 Here are the top searched questions in the past 24 hours.#coronavirus #GoogleTrends pic.twitter.com/bPVsL3hCYW
— GoogleTrends (@GoogleTrends) January 21, 2020
गुगल ट्रेंड नुसार 18 जानेवारीनंतर युजर्स गुगलवर ‘कोरोना व्हायरस’, ‘बिअर व्हायरस’ आणि ‘बिअर कोरोना व्हायरस’ सर्च करत आहेत. यासोबत लोक या व्हायरसच्या लक्षणांबद्दल देखील सर्च करत आहे.
बिअर कंपनी कोरोना एक्स्ट्राने देखील सांगितले की, त्यांना विश्वास आहे की ग्राहक त्यांच्या बिअरला जीवघेण्या कोरोना व्हायरसशी जोडणार नाही. या बिअरचा या व्हायरसशी काहीही संबंध नाही.