विद्यार्थ्यांनी सादर केली ‘बॅक गेअर’ असलेली बाईक

आग्रा येथील दयालबाग शिक्षण संस्थेत फाउंडर्स डे निमित्ताने वेगवेगळ्या बाईकचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या वेळी 4000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या दरम्यान 450 मॉडेल्सचे प्रदर्शन करण्यात आले. या दरम्यान बँचलर ऑफ वोकेशनल ऑटोमोबाईलचे विद्यार्थी अमित अग्रवाल, विशाल अग्रवाल, राहुल शर्मा आणि विजय कुमार यांनी सादर केलेली ईलेक्ट्रिक बाईक सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली.

अमितने सांगितले की जुनी बाईक मोडिफाय करून इलेक्टिर करण्यासाठी 44 हजार रुपये खर्च आला. या बाईकमध्ये 48 बोल्टची बॅट्री लावण्यात आली असून, ही बाईक फूल चार्जमध्ये 32 किमीचे अंतर पार करू शकते. या बाईकचा ताशी वेग 28 ते 30 किलोमीटर आहे. बाईकमध्ये चार गेअर देण्यात आले आहेत. विशेष गोष्ट म्हणजे यात बॅक गेअर देखील आहेत, ज्याद्वारे बाईक मागील बाजूला देखील चालते.

Image Credited – Amarujala

या प्रदर्शनादरम्यान विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. विविध राज्यातून आलेल्या लोकांनी स्टॉल लावले होते. यावेळी हस्त निर्मित वस्तूंची देखील विक्री करण्यात आली.

Image Credited – Amarujala

ऑटोमोबाईलच्या अन्य 9 विद्यार्थ्यांनी कंप्रेस्ड एअर इंजिन मॉडेल सादर केले. नरेश कुशवाहने सांगितले की पेट्रोल आणि डिझेल शिवाय हवेद्वारे ही गाडी चालवता येते. यावेळी एअर कंप्रेसर, कंटेनर आणि सिलेंडर विद पिस्टनच्या मदतीने मॉडेल चालवून दाखवण्यात आले. या मॉडेलमध्ये मॅन्युअल कंप्रेसरचा वापर करण्यात आला आहे.

Leave a Comment