इस्रोकडून GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण


नवी दिल्ली – भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून इस्रोने GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. GSAT-30 चे येरोपियन हेवी रॉकेट एरियन -5 येथून शुक्रवारी पहाटे 2.35 मिनिटांनी इस्त्रोने प्रक्षेपण केले. फअरान्सच्या गुएना येथील कोरोउ बेटावरुन हे प्रक्षेपण करण्यात आले. प्रक्षेपण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच GSAT-30 मधून एरियन -5 VA251 चा वरचा भाग यशस्वीरित्या बाजूला झाला. वर्ष 2020 मधील इस्त्रोची ही पहिलीच कामगिरी आहे.

यासंदर्भात इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार GSAT-30 एक दूरसंचार उपग्रह असून इनसॅट-4 ए सॅटेलाईटच्या ठिकाणी काम करणार आहे. दरम्यान, आता इनसॅट सॅटेलाईट-4 चा कालावधी संपत आला आहे आणि इंटरनेट तंत्रज्ञानात प्रचंड बदल होत असल्यामुळे अतिप्रभावशाली उपग्रहाची आवश्यकता होती. ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी इस्त्रोने GSAT-30 लॉन्च केला आहे.

सुमारे 3100 किलोग्राम एवढे GSAT-30 उपग्रहाचे वजन आहे. हा उपग्रह प्रक्षेपण झाल्यानंतर 15 वर्षांपर्यंत कार्यरत असणार आहे. हा उपग्रह जिओ-इलिप्टिकल ऑर्बिट काम करेल. यात दोन सोलर पॅनल आणि बॅटरी असल्यामुळे या उपग्रहाला उर्जा मिळेल. GSAT-30 उपग्रह सॅटेलाईट इनसॅट-4ए ची जागा घेईल. इनसॅट -4 ए 2005 मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता. नव्या उपग्रहामुळे इंटरनेटचे स्पीड प्रचंड वाढणार आहे. ज्याचा मोबाईल सेवेवर प्रचंड परिणाम होणार आहे.

Leave a Comment