देसी गर्लचा हा ड्रेस आहे लाखमोलाचा


सध्या सोशल मीडियावर बॉलीवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियंका चोप्राचा नव्या ड्रेसमधील एक फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहे. या ड्रेसची किंमत ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. सध्या प्रियंका आपल्या चित्रपटांमुळे नव्हे तर आपल्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. प्रियंका चोप्रा आता तिने परिधान केलेल्या महागड्या ड्रेसमुळे चर्चेत आहे. लाखो रुपयांमध्ये प्रियंकाने परिधान केलेल्या या ड्रेसची किंमत आहे.

View this post on Instagram

More Priyanka yesterday #priyankachopra

A post shared by Priyanka-Chopra.us (@priyankacentral) on


प्रियंका आपल्या लूक, ड्रेस, फॅशनमुळे नेटकऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करत असते. तिचा नवरा निक जोनास याच्यासोबत असो किंवा रेड कार्पेटवर असो आपल्या ग्लॅमरस लूकने प्रियंका सर्वांची मने जिंकते. नुकतेच प्रियंकाचे काही फोटोज सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. प्रियंका या फोटोमध्ये आपला पती निक जोनास याच्यासोबत दिसत आहे. प्रियंकाने एक बरोको रोडियो प्रिंट स्लीवलेस ड्रेस परिधान केला आहे. ज्यावर व्हाईट बेस आणि वर्साचे प्रिंट डिझाईन बनवण्यात आलेली आहे.

View this post on Instagram

Priyanka yesterday in LA #priyankachopra

A post shared by Priyanka-Chopra.us (@priyankacentral) on


प्रियंकाने परिधान केलेल्या या ड्रेसची किंमत 1450 डॉलर म्हणजेच जवळपास 1,03,581 भारतीय रुपये एवढी आहे. प्रियंका चोप्रा नेहमीच ब्रँडेड, स्टायलिश आणि फॅशनेबल ड्रेस परिधान करत असते. महागड्या आऊटफिटने प्रियंकाचे वॉर्डरोब संपूर्ण भरलेला आहे.


प्रियंकाच्या या आऊटफिटवर प्लझिंग नेकलाईन आणि समोर थायवर हाय स्लीट कट डिझाइन बनवण्यात आली आहे. प्रियंकाने या ड्रेसवर ब्लॅक कलरचा जॅकेट परिधान केल्यामुळे प्रियंकाचा लूक आणखीनच खास बनत आहे. सोबतच प्रियंकाने हिल्स आणि हातात क्लच कॅरी केले आहे.

Leave a Comment