गेल्या काही दिवसांपासून दुबई शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. जोरदार पाऊस आणि वीजेचा कडकडाट यामध्ये देखील एका फोटोग्राफरने अशी कामगिरी केली आहे की त्याच्या कलेचे सर्वत्र कौतूक होत आहे. जोहेब अंजुम या फोटोग्राफरने जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर वीज कोसळतानाचा अप्रतिम क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपला आहे. या फोटोचे जगभरात कौतूक होत आहे.
Video : कॅमेऱ्यात कैद झाला जगातील सर्वात उंच इमारतीवर वीज पडतानाचा क्षण
हा शानदार फोटो काढण्यासाठी अंजुमने 7 वर्ष मेहनत घेतली. जेव्हाही दुबईत पाऊस पडायचा, त्यावेळी तो फोटोसाठी रात्रभर बुर्ज खलिफाच्या बाहेर बसत असे. अखेर 2.720 फूट उंच स्कायस्क्रेपरवर वीज कडाडतानाचा फोटो त्याने काढला.
अंजुम म्हणाला की, देवानेच या क्षणाची योजना बनवली होती. बुर्ज खलिफावर वीज पडतानाच्या दृश्याने माझी 2020 ची सुरूवात चांगली केली.
दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान यांनी देखील वीज बुर्ज खलिफावर कोसळतानाचा हा अद्भूत क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. संयुक्त अरब अमिरातमध्ये 1996 नंतर सर्वाधिक पाऊस यावर्षी झाला आहे
