
दुबई: आयसीसीच्या ‘वनडे क्रिकेटर ऑफ द इअर २०१९’ या पुरस्कारासाठी भारताचा सलामीवीर आणि हिटमॅन रोहित शर्मा याची तर ‘स्पिरीट ऑफ क्रिकेट’ या पुरस्कारासाठी भारताचा कर्णधार विराट कोहली याची निवड करण्यात आली आहे.
आयसीसीकडून होणार रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा सन्मान!
5️⃣ #CWC19 centuries
7️⃣ ODI centuries in 2019Your 2019 ODI Cricketer of the Year is Rohit Sharma.#ICCAwards pic.twitter.com/JYAxBhJcNn
— ICC (@ICC) January 15, 2020
२०१९ हे वर्ष रोहित शर्मासाठी शानदार ठरले होते. रोहितने गेल्या वर्षी एकदिवसी, कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्ये १० शतक झळकावली होती. यापैकी ५ शतक ही इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत झळकवली होती.
Who remembers this gesture from Virat Kohli during #CWC19?
The Indian captain is the winner of the 2019 Spirit of Cricket Award 🙌 #ICCAwards pic.twitter.com/Z4rVSH8X7x
— ICC (@ICC) January 15, 2020
विराटला स्पिरिट ऑफ क्रिकेट हा पुरस्कार आयसीसीने दिला आहे. आयसीसीने या पुरस्काराची घोषणा करताना विराटचा विश्वचषक स्पर्धेतील एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
