दंतवैद्यकीय महिलेला प्रियकराचे गुप्तांग कापल्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा


बंगळुरू – बंगळुरू येथील कोरमंगला शहरातील एका न्यायालयाने प्रियकराचे गुप्तांग कापल्याप्रकरणी आरोपी दंतवैद्यकीय महिलेला दोषी ठरवले असून दहा वर्षांची शिक्षा या महिलेला सुनावली त्याचबरोबर १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाने आरोपी महिलेला पीडित व्यक्तीला दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी, असेही सांगितले.

पीडित व्यक्तीसोबत या महिलेचे प्रेमसंबंध होते. पण दुसऱ्या मुलीसोबत प्रियकराने लग्न केल्याने ती नाराज होती. आपल्यासोबतच लग्न करण्यासाठी ती दबाव आणत होती. पण, तिला पीडित व्यक्ती टाळत होता. प्रियकराला याचा राग मनात धरून आपल्या दंत रुग्णालयात बोलावले आणि त्याला ज्यूसमध्ये गुंगीचे औषध टाकून पाजले. तो बेशुद्ध झाल्यानंतर रुग्णालयातील साहित्याच्या साहाय्याने त्याचे गुप्तांग कापले. यानंतर ती स्व:त त्याला रुग्णालयात घेऊन गेली आणि तेथून फरार झाली.

न्यायालयात पीडित व्यक्तीने याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने महिलेला दहा वर्षांची शिक्षा सुनावली असून नुकसान भरपाईसाठी २ लाख रुपये द्यावेत, असे सांगितले आहे. ही घटना २९ नोव्हेंबर २००८ रोजी घडली होती. त्यावर न्यायालयाने ११ डिसेंबरला निकाल दिला.

Leave a Comment