
पालघर – शनिवारी सकाळी पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले असून या भूकंपाची तीव्रता नॅशनल सेंटर फॉर सेस्मोलॉजीनुसार 3.8 रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली. कोणतीही जीवितहानी यात झाली नाही. या परिसराला गेल्या वर्षभरापासून भूकंपाचे हादरे बसत आहेत.
भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरले पालघर
भूकंपाचे सौम्य धक्के दापचरी, बोर्डी, कासा, उधवा, धुंदलवाडी येथेही जाणवले. या भूकंपाच्या धक्क्यामुळे काही घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. डहाणू परिसरात मागील तीन दिवसांपासून सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचे नागरिकांनी सांगितले. सतत बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
