
सातारा : आज पहाटे 3 च्या सुमारास पशुवैधक डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्याकांडातील चारही आरोपी पोलीस एनकाऊंटरमध्ये ठार करण्यात आले. या आरोपींना अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पोलिसांची बंदूक हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यांना त्यावेळी थांबवण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यावेळी गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेवर माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उदयनराजेंकडून हैदराबाद पोलिसांचे कौतूक
हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले ४ आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एनकाऊंटरमध्ये मारले गेले. तेलंगणा पोलिस दलाचे मनःपूर्वक अभिनंदन! असे ट्विट उदयनराजेंनी केले आहे. ४ आरोपींनी हैदराबादमध्ये २७ नोव्हेंबरला पहिली पीडित महिलेची गाडी पंक्चर केली आणि मदत करण्याचे नाटक केल्यानंतर चारही आरोपी तिला टोल प्लाझाजवळच्या निर्जन स्थळी घेऊन गेले. याठिकाणी पीडितेवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली.
