महिलेने चक्क 10 महिन्यांच्या बाळाला सोबत घेऊन पुर्ण केली मॅरोथॉन

अमेरिकेच्या ज्युलिया वेबने 10 महिन्यांच्या मुलीला स्ट्रोलरमध्ये घेऊन हाफ मॅरोथॉन (21.0975 किमी) पुर्ण केली आहे. तीन मुलांची आई असलेल्या ज्युलियाने ओकलाहोमा येथे झालेल्या रूट 66 हाफ मॅरोथॉन 1 तास 21 मिनिट 23 सेंकदात पुर्ण करत सुवर्ण पदक मिळवले.

तिने स्ट्रोलरला धक्का देत सर्वात जलद मॅरोथॉन पुर्ण केली. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या खेळाडूने मॅरोथॉन पुर्ण करण्यासाठी ज्युलियापेक्षा 2 मिनिटे अधिक वेळ घेतली.

या विक्रमाचा व्हिडीओ आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सला पाठवण्यात आला आहे. वर्ल्ड रेकॉर्डची समिती त्यांचा व्हिडीओ बघितल्यानंतर 12 आठवड्यात निर्णय घेईल. सध्याचा विक्रम 1 तास 27 मिनिटे 34 सेंकदांचा आहे. हा विक्रम लिंडेस जेम्सने 2016 मध्ये केला होता. ज्यूलिया 4 आणि 7 वर्षांच्या अशा आणखी दोन मुली आहेत. ज्यूलिया आता अमेरिकेच्या ऑल्मिपिक टीमच्या ट्रायलसाठी प्रयत्न करत आहे.

Leave a Comment