
मिस इंडिया असलेली अभिनेत्री ईशा गुप्ता राज 3, रुस्तम, कमांडो २’ आणि ‘बादशाहो’ या चित्रपटात झळकली होती. ईशा गुप्ता ही सोशल मीडियावर खुपच सक्रिय असते. ती आपले हॉट फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करुन चर्चेत असते.
ईशाच्या बिकिनी लूकवर नेटकरी फिदा
तिने नुकताच सोशल मीडियावर आपला आपला रेड बिकिनीतला एक फोटो पोस्ट केला आहे. चाहत्यांनीही हा लूक पाहून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
इन्स्टाग्राम अकाउंटवरून ती नेहमीच आपले हॉट व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. तिने नुकतेच एक हॉट फोटोशूट केल्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. रेड बिकिनी आणि डेनिमच्या जॅकेटमध्ये असलेली ईशा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
हा फोटो सोशल मीडियावर पाहून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिचा हा स्मोकी आईज, बीच वेव्ज आणि हूप इअररिंग्ज असा हॉट लूक सर्वांच्याच पसंतीस पडला आहे. इन्स्टाग्रामवर ईशा ही बोल्ड क्लिक्ससाठी ओळखली जाते.
२०१२मध्ये ‘जन्नत २’ या चित्रपटातून ईशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘राज ३’, ‘रुस्तम’, ‘कमांडो २’, ‘बादशाहो’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाचेही कौतुक झाले होते.
ती शेवटची ‘टोटल धमाल’ या चित्रपटात दिसली होती. नुकताच एक हॉट व्हिडिओ सोशल मीडियावर ईशाने शेअर केला होता. गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये असलेल्या ईशाचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडला होता.
