गर्भवती महिलेसाठी देवदूत बनले भारतीय नौदल

भारतीय नौदल अंदमान निकोबार द्वीप समूहाच्या एका गावातील गर्भवती महिलेसाठी संकटमोचकाप्रमाणे मदतीला आले. गर्भवती महिलेला त्वरित वैद्यकिय मदतीची गरज होती, अशा वेळी नौदलाने त्वरित हालचाल करत महिलेस मदत केली. भारतीय नौदल आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या मदतीने गर्भवती महिलेची प्रसुती करण्यात आली.

आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेता नौदलाने फास्ट इंटर्सेप्टर क्राफ्ट (एफआयसी) गावात पाठवले. ही एक छोटी बोट असते. नौदल अधिकारी आणि आरोग्य अधिकारी हे दुपारी 4.30 वाजता डेरिंग गावात पोहचले.

महिलेने या बोटीमध्येच बाळाला जन्म दिला. त्यानंतर महिला आणि बाळ दोघांना कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये पाठवण्यात आले. आई आणि बाळ दोघेही व्यवस्थित असल्याचे, अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Comment