‘तानाजी’मध्ये ही व्यक्तिरेखा साकारणार काजोल


पती अजय देवगणच्या आगामी ‘तानाजी – द अनसंग वारियर’ या चित्रपटात अभिनेत्री काजोल सावित्रीबाई मालुसरे ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. या चित्रपटातील तिचा लूक एका पोस्टरद्वारे नुकताच रिलीज करण्यात आला आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काजोलने हे पोस्टर रिलीज केले असून त्या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये, मैं आपको हारने नही दूँगी, असे तिने लिहिले आहे.


१० जानेवारी २०१० ला ‘तानाजी – द अनसंग वारियर’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. उद्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटात अजय देवगण हा तानाजी मालुसरेंची मुख्य व्यक्तीरेखा साकारणार आहे. हा एक शिवकालिन ऐतिहासिक विषयावरचा चित्रपट आहे. कोंढाणा किल्ला स्वराज्यात आणण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी स्वतःचे प्राण पणाला लावून केलेल्या लढाईची ही गाथा मोठ्या पडद्यावर हिंदीत पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment