टीक-टॉकचे लवकरच ‘म्यूझिक स्ट्रिमिंग’ सेवेत पदार्पण

टिकटॉक अॅपची मालकी असलेली चिनी कंपनी बाइटडान्स टेक्नोलॉजीने काही दिवसांपुर्वीच आपला पहिला स्मार्टफोन लाँच केला होता. आता कंपनी म्यूझिक स्ट्रिमिंग सर्विसमध्ये देखील पदार्पण करणार आहे. यासाठी कंपनी युनिवर्सिल म्यूझिक, सोनी म्यूझिक आणि वॉर्नर म्यूझिक या सारख्या मोठ्या म्यूझिक लेबलशी देखील चर्चा करण्यास सुरूवात केली आहे.

बाइटडान्स पुढील महिन्यात आपली म्यूझिक सर्विस लाँच करण्याची शक्यता आहे. भारत, इंडोनेशिया आणि ब्राझील या सारख्या देशांमध्ये ही सर्विस आधी सुरू केली जाईल. त्यानंतर अमेरिकेत ही सर्विस सुरू करण्यात येईल.

याशिवाय आपल्या सर्विसमध्ये कंपनी शॉर्ट व्हिडीओ क्लिप्सचा देखील पर्याय देईल. कंपनी या म्यूझिक अॅपला काय नाव देणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याशिवाय या सर्विससाठी महिन्याला 10 डॉलर पेक्षा कमी शुल्लक आकारले जाईल. अमेरिकेत स्पॉटिफाय, अॅपल सारख्या म्यूझिक सर्विससाठी 10 डॉलर (700 रुपये) शुल्लक आकारले जाते.

Leave a Comment