Video : ‘पगडी काढा आणि केस कापा’, असे म्हणणाऱ्या व्यक्तीला शीख नेत्याने दिले हे उत्तर

कॅनेडातील न्यू डेमोक्रेटिक पार्टीचे नेते जगमीत सिंह यांचे एक ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक व्यक्तीने त्यांना डोक्यावरची पगडी काढून केस कापण्यास सांगितले होते. असे केल्याने ते कॅनेडियन वाटतील, असेही म्हटले होते. मॉन्टिरियल येथे जगमीत सिंह यांनी या व्यक्तीला दिलेले उत्तर चर्चेचा विषय ठरत आहे.

दोघांमध्ये सुरू असलेल्या संवादाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 26 सेंकदाच्या या व्हिडीओमध्ये दिसते की, शीख नेते एका व्यक्तीशी हात मिळवतात व त्याच्याशी बोलण्यास सुरूवात करतात. त्यावेळी ती व्यक्ती त्यांना म्हणते की, तुम्ही पगडी काढून टाकली पाहिजे व केस देखील कापले पाहिजेत. असे केल्याने तुम्ही कॅनेडियन दिसाल. यावर जगमीत सिंह उत्तर देतात की, माझ्या विचाराने कॅनेडामध्ये प्रत्येक प्रकारची लोक राहतात. हीच तर कॅनेडाची सुंदरता आहे.

यावर ती व्यक्ती म्हणते की, जर तुम्ही रोममध्ये गेला तर रोमन्स सांगेल तसेच करता. यावर जगमीत सिंह म्हणाले की, मात्र हा कॅनेडा आहे. तुम्हाला जे आवडते ते करा.

व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर जगमीत सिंह यांनी व्हिडीओ रिट्विट करत लिहिले की, अनेक कॅनेडियन म्हणतात की, यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला बदलावे लागेल. माझा संदेश तुमच्यासाठी आहे – जे तुम्ही आहात तेच रहा. स्वतःला कधीच बदलू नका. प्रत्येक जण स्वतःच्या आवडी-निवडीचा मालक आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत एक मिलियन पेक्षा अधिक व्यूज आले आहेत. जगमीत सिंह यांच्या या उत्तरामुळे त्यांची प्रशंसा केली जात आहे.

Leave a Comment