कोणत्याही मेडिकल इमर्जन्सीसाठी आरोग्य विमा असणे गरजेचे असते. एक योग्य आरोग्य विमा कोणत्याही गंभीर आजारामुळे होणारा आर्थिक खर्च भरून काढतो. आता केंद्र सरकार देखील यावर मोठा निर्णय घेणार आहे.
आरोग्य विमाधारकांना सरकार देणार मोठे गिफ्ट
आता आरोग्य विमा घेण्याची इच्छा असणाऱ्याला लवकरच प्रिमियम हप्त्यांमध्ये भरण्याचा पर्याय मिळणार आहे. म्हणजेच आरोग्य विमाधारक मासिक, तिमाही आणि सहामाही आधारावर प्रिमियम जमा करू शकेल. सध्या प्रिमियम हे वार्षिक हप्त्यामध्ये भरावे लागत असे. विमा नियामक इरडाने प्रिमियमच्या हप्त्यासंबंधित परिपत्रक जारी केले आहे. इरडाने परिपत्रकामध्ये म्हटले आहे की, हप्त्यामध्ये बदल केल्यामुळे मूळ प्रिमियम आणि शुल्कामध्ये बदल करण्यात येऊ नये. याचबरोबर प्रिमियम मासिक, तिमाही आणि सहामाही ही भरता येऊ शकते.
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाला यामुळे नवीन विमा सादर करण्यास अधिक सोपे जाईल. तसेच, यामुळे आरोग्य विम्यामध्ये देखील अधिक वाढ होईल.
इरडाच्या या नियमाचा फायदा एकदम प्रिमियमची रक्कम भरू न शकणाऱ्या विमानधारकाला होईल. तसचे इरडाने परिपत्रकामध्ये म्हटले आहे की, 65 वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक देखील विमा घेऊ शकतात.
