व्हॉट्सअ‍ॅपचे आणखी एक नवे फिचर तुमच्या भेटीला

मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने अँड्राईड युजर्स आणि आयओएस युजर्ससाठी नवीन फिचर्स लाँच केले आहेत. या नवीन फिचर्समध्ये युजर्सला सिक्युरिटी, वॉईस मेसेज, स्टोरी यासारखे अनेक खास फिचर्स मिळतील.

फिंगरप्रिंट आणि फेस आयडी अनलॉक फिचर –

अँड्राइड आणि आयओएस युजर्स व्हॉट्सअ‍ॅपच्या फिंगरप्रिंट आणि फेस आयडी अनलॉक या फिचरच्या मदतीने चॅट, व्हिडीओ आणि फोटोज सिक्युर ठेऊ शकतील. तसेच, युजर्स फिंगरप्रिंट आणि फेस आयडीद्वारे अ‍ॅप ओपन करू शकतील. मेसेज नॉटिफिकेशन हाईड करण्याचा पर्याय देखील युजर्सला मिळेल.

कॉन्जक्युटिव वॉईस मेसेज फिचर –

व्हॉट्सअ‍ॅपने वॉईस मेसेज फिचर अपडेट केले आहे. ज्यामुळे सर्व मेसेज आपोआप प्ले होतील. युजर्स सतत वॉईस मेसेज ऐकू शकतील, प्रत्येक वेळी वॉइस मेसेज प्ले करण्याची गरज राहणार नाही. एक वॉइस मेसेज प्ले झाल्यानंतर बाकीचे मेसेज देखील आपोआप प्ले होतील.

फेसबुक स्टोरी इंटीग्रेशन फिचर –

फेसबुक स्टोरी इंटीग्रेशन फिचरद्वारे युजर्स व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स थेट फेसबुकवर शेअर करू शकतील. या फिचरचा वापर करण्यासाठी युजर्सला तीन डॉट्सच्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर शेअर टू फेसबूकवर क्लिक करावे. त्यानंतर युजर्स स्टेट्स फेसबुकवर शेअर करू शकतील.

ग्रुप इनवाइट फिचर –

व्हॉट्सअ‍ॅपच्या या फिचरमुळे युजर्सच्या परवानगी शिवाय कोणाही ग्रुपमध्ये अँड करू शकणार नाही. यासाठी युजर्सला Nobody हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर ग्रुपचे इनविटेशन आल्यानंतर, युजर्सच्या परवानगीनंतरच ग्रुपमध्ये अँड केले जाईल.

Leave a Comment