
मुंबई : तुमच्यापैकी कोणाला जर असा प्रश्न विचारला की महिला आणि पुरुष यापैकी सर्वात जास्त आळशी कोण ? तर याचे तुम्हा प्रत्येकाचे वेगवेगळे उत्तर असू शकते. पण आता याबाबत एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. सर्वात आळशी कोण? याबाबतची माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. शारीरिक श्रम करण्यात भारतातील 35 टक्क्यांहून अधिक लोक आळसपण करत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
महिला या पुरुषांपेक्षा असतात सर्वाधिक आळशी ?
संशोधनानंतर, याबाबतची आकडेवारी जागतिक आरोग्य संस्थेने (WHO) दिली आहे. या संशोधनाच्या आधारे, शारीरिक कार्यात सक्रियता न दाखवणाऱ्या लोकांना हृदयासंबंधी रोग, कॅन्सर, मधुमेह आणि मानसिक आजारांचा धोका संभवण्याची शक्यता असल्याचे जागतिक आरोग्य संस्थेने म्हटले आहे.
संशोधनातून, 2016 मध्ये शारीरिक श्रम कमी करणाऱ्या महिलांची संख्या 50 टक्के होती. तर शारीरिक श्रम करणाऱ्या पुरुषांची संख्या 25 टक्के एवढी होती.
