फ्रेंडशीप डेच्या पार्श्वभूमीवर सचिनने ट्विट केला कांबळीसोबतचा फोटो


मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळी हे दोघेही दिवंगत प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे आवडते दोन शिष्य होते. दरम्यान भारतीय क्रिकेट जगतामध्ये त्यांची मैत्री नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, या दोघांमध्ये मधल्या काही काळात दुरावा निर्माण झाला होता. पण, फ्रेंडशीप डेच्या पार्श्वभूमिवर एक फोटो ट्विट करत सचिनने ‘ही दोस्ती तुटायची नाय’ असा संदेश एकप्रकारे दिला आहे.


काही तासांपूर्वी सचिन तेंडूलकरने एक ट्विट केला असून विनोद कांबळीसोबतचा फोटो त्याने त्या ट्विटमध्ये जोडला आहे. त्याने त्या फोटोला ‘कांबळ्या, मला शालेय दिवसातील हा फोटो मिळाला आहे. जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत, म्हणून हा फोटो मी पुन्हा टाकत असल्याचे मजेशीर कॅप्शनही दिले आहे.

दरम्यान, विनोद कांबळी याने २००९ मध्ये एका टीव्ही शोदरम्यान सचिनने मला क्रिकेटमध्ये परत कमबॅक करण्यासाठी मदत केली नसल्याचा गंभीर आरोप केला. सचिन आणि कांबळी यांच्या मैत्रीत यामुळे दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांच्यातील दुरावा काही वर्षांनी कमी झाला आणि पुन्हा ते दोघे चांगले मित्र बनले. दरम्यान, फ्रेंडशीप डेच्या पार्श्वभूमिवर सचिनने केलेले ट्विट लोकांना खूपच आवडले असून लोक आवडीने त्या ट्विटवर रिट्विट करत आहेत.

Leave a Comment