योगी सरकारने 17 ओबीसी जातींचा केला अनुसूचित जातींच्या यादीत समावेश


लखनौ – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मागासवर्गीय जातींसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अनुसूचित जातींच्या सूचीमध्ये 17 मागास जातींचा (ओबीसी) योगी सरकारने समावेश केला आहे. ह्या जाती सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, असे योगी सरकारने म्हटले आहे.

अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र या 17 मागास जातींना दिले जाणार आहे. जिल्हा अधिकाऱ्यांना यासाठी या 17 मागास जातींच्या कुटुंबांना जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षानेदेखील यापूर्वी असाच प्रयत्न केला होता. पण तो अपयशी ठरला होते.

मागास जातीच्या सुचीमध्ये निषाद, बिंद, मल्लाह, केवट, कश्यप, भर, धीवर, बाथम, मछुआरा, प्रजापती, राजभर, कहार, कुम्हार, धीमर, मांझी, तुरहा, गौंड या जातींचा समावेश आहे.

Leave a Comment