
मुंबई – मुंबई हे राजधानी दिल्लीनंतर देशातीत सर्वात मोठे शहर आहे. दिल्लीचा विस्तार होण्यासाठी शहराच्या आजूबाजूला भरपूर जागा आहे, पण मुंबई ही दिवसेंदिवस उभी वाढत असल्याचे दिसत आहे. मुंबईच्या हद्दीमध्ये आता अजून वाढ हा ठराव मंजूर झाला तर होणार आहे. वसई, पेण, खालापूर, पनवेल, पालघर आणि अलिबागपर्यंत मुंबईचा विस्तार होणार आहे. यामुळे आता या ठिकाणचे लोकही ‘मुंबईकर’ म्हणून ओळखले जातील. त्यामुळे मुंबईची लोकलही आता थेट अलिबागपर्यंत पोहोचणार आहे.
वसई, पेण, खालापूर, पनवेल, पालघर आणि अलिबागपर्यंत होणार मुंबईचा विस्तार
मुंबई शहराची हद्द वाढवण्याचा ठराव एकमताने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झाल्यामुळे मुंबईच्या पायाभूत सुविधांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होईल. चार हजार चौरस किमीच्या परिसराच्या मुंबईचा विस्तार आता तब्बल सहा हजार चौरस किमीपर्यंत झाला असल्यामुळे मुंबई शहराच्या आसपासच्या परिसराचा विकास होण्यास मदत होणार आहे.
केवळ मुंबई व ठाण्यात मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा पैसा न वापरता आसपासच्या परिसरात वापरला गेला पाहिजे. अशी मागणी ही लोकप्रतिनिधींनी केली होती, ती आता मंजूर झाल्यामुळे पालघर, वसई, खालापूर, पेण, पनवेल, अलिबाग इत्यादी तालुक्यांचे भाग आता मुंबईच्या हद्दीत येणार आहेत. या ठिकाणच्या अनेक पालिका, ग्रामपंचायत, नगरपंचायत यांना या निर्णयामुळे एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी मिळणार आहे.
