
नवी दिल्ली : भाजपचे नाराज खासदार शत्रुघ्न सिन्हा हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून त्यांनी आज दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्याचबरोबर शत्रुघ्न सिन्हा यांच्या काँग्रेस प्रवेशाची औपचारिक घोषणा 6 एप्रिलला होणार आहे.
राहुल गांधींच्या भेटीला शत्रुघ्न सिन्हा
शत्रुघ्न सिन्हा यांना भाजपने पटनासाहिब येथून उमेदवारीन न दिल्यामुळे ते नाराज होते. त्यांनी यामुळेच भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. शत्रुघ्न सिन्हा यांची राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि इतर पक्षांची मोट बांधून महागठबंधनला एकत्र ठेवण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचे म्हटले जात आहे. पटना साहिबमधून त्यांना उमेदवारी त्यांच्या या कामाची पावती म्हणूनच देण्यात येण्याची शक्यता आहे. शत्रुघ्न सिन्हा केंद्रीय मंत्री असलेले रविशंकर प्रसाद यांच्याविरोधात निवडणूक लढवू शकतात.
