आम्रपाली ग्रुपविरोधात महेंद्रसिंह धोनीची सर्वोच्च न्यायालयात धाव

dhoni3
नवी दिल्ली – आम्रपाली ग्रुपविरोधात ४० कोटी रुपये थकवल्या प्रकरणी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बांधकाम क्षेत्रातील आम्रपाली ग्रुप हे नाव अग्रगण्य असून या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.

धोनीसोबत आम्रपाली ग्रुपने २००९ साली केलेल्या करारानुसार आम्रपाली ग्रुपचा २०१६ पर्यंत धोनी ब्रॅन्ड अॅम्बेसेडर होता. कंपनीला या करारानुसार धोनीच्या प्रतीभेचा वापर जनसंपर्क आणि विपणन कार्यासाठी करता येणार होता. पण आम्रपाली ग्रुपने यासाठीचे ४० कोटी रुपये थकवल्याचा आरोप धोनीने केला असून त्याने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Leave a Comment