
हॉलीवूड चित्रपट फास्ट अँड फ्युरीअस मध्ये वाऱ्याच्या वेगाने धावणारी फोर्ड शेल्बी सर्वाना आठवत असेल. ही सुपरफास्ट आणि अत्यंत आकर्षक अशी कार लवकरच भारतीय रस्त्यांवर धावताना पाहायला मिळणार आहे. शेल्बी ब्रांडने भारतात एन्ट्री केली असून शेल्बी इंडियाचे टेक्निकल पार्टनर म्हणून पुण्याची एजेपी ग्रुप काम करणार आहे. हा ग्रुप त्यांच्या एजेपी परफॉर्मन्स स्टुडीओ मध्ये या कार असेम्बल करणार आहे. शेल्बीची पहिली कार दुसऱ्या सहामाहीत भारतीय रस्त्यावर दिसेल. या कार्सची किंमत २ कोटी रुपयांच्या दरम्यान असेल असे समजते.
फोर्डचा वादळी शेल्बी ब्रांड लवकरच भारतीय रस्त्यांवर

एजेपीचे नवे सीइओ मनस देवन यांनी सांगितले की शेल्बी रेसिंग कार फोर्ड प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली असून अधिक चांगल्या परफॉर्मन्ससाठी तिच्यात काही मॉडीफीकेशन केली गेली आहेत. या कार आम्ही असेम्बल करणार आहोत तसेच गरजेनुसार त्यात सुधारणा आणि अपग्रेडेशनही करणार आहोत. शेल्बी इंडिया या कारचे मार्केटिंग आणि वितरण करणार आहे. शेल्बीच्या लोकप्रिय मस्टांग मॉडेलमधील कोब्रा, स्नेक, जीटी ३५०, जीटी ५०० यापैकी एखादीतरी भारतात नक्कीच लाँच केली जाणार आहे.
