
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बॉलीवूडमधला भाईजान सलमान खान इंदोर मधून कॉंग्रेसच्या तिकिटावर मैदानात उतरत असल्याचा बातम्या आल्यानंतर सलमान खानने ट्विटरवरून तो निवडणूक लढविणार नसल्याचे तसेच कोणत्याची राजकीय पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गुरुवारी हे ट्विट सलमानने केले आहे. त्याचबरोबर दुसरे ट्वीट करून त्याने प्रत्येक मतदाराने आपल्या मताधिकार वापरावा असे अपीलही केले आहे.
निवडणूक लढविणार नाही आणि प्रचारही करणार नाही सलमान खान
पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी सलमान खान, आमीर खान यांना ट्विटरवर टॅग करून युवकांना मतदानासाठी प्रवृत्त करा असे अपिल केले होते. त्याला रिट्वीट करताना सलमानने आपला देश महान लोकशाही देश आहे आणि मतदान करणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असल्याचे तसेच मतदान करून सरकार बनविण्याच्या प्रक्रियेत भागीदार व्हा असे आवाहन केले होते.
