भारतीय पासपोर्ट धारकांसाठी व्हिसासंबंधी काही उपयुक्त माहिती

visa
भारतीय लोकांचे गेल्या काही वर्षांमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने तसेच पर्यटनाच्या निमित्ताने परदेशगमन वाढले आहे. त्या अनुषंगाने भारतीय पासपोर्ट धारक परदेशी प्रवास करताना आवश्यक असेलेले परवानगीपत्र, म्हणजेच व्हिसा मिळण्यासाठी काही महत्वाची माहिती लक्षात घेणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तींचे वय अठरा वर्षांच्या पेक्षा कमी असते, म्हणजेच ज्या व्यक्ती ‘डिपेंडंट’ असतात, अशा व्यक्तींना दर वर्षी पंधरा जुलै ते पंधरा सप्टेंबर या काळामध्ये मोफत व्हिसा मिळण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे व्हिसा फी भरताना प्रवासाचा काळ जुलै ते सप्टेंबर दरम्यानचा असल्यास हा नियम लक्षात घेणे चांगले.
vis1
म्यानमार आणि उझबेकिस्तान या देशांनी आतापासून यात्रेकरूंसाठी ‘इ-व्हिसा’ची सोय उपलब्ध करून दिली आहे. तसेच कोणत्याही फ्रेंच विमानतळावरील आंतरराष्ट्रीय ‘झोन’मधून ‘ट्रांझीट’ करण्यासाठी आतापासून ट्रांझीट व्हिसाची गरज असणार नाही. उदाहरणार्थ, एखाद्याला दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी आधी फ्रांसपर्यंत जाऊन तिथून पुढचे विमान घ्यायचे असल्यास, पूर्वी ‘ट्रांझीट व्हिसाची’ गरज पडत असे. नव्या नियमांच्या अनुसार आतापासून असे ट्रांझीट व्हिसा घेण्याची आवश्यकता राहणार नाही.
vis2
ज्यांच्याकडे अमेरिका, इंग्लंड, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, किंवा शेंजेन व्हिसा असतील त्यांना आतापासून ओमानला जाण्यासाठी तिथे पोहोचल्यावर व्हिसा घेण्याची सोय, म्हणजेच ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पूर्वी जपानला जाण्यासाठी व्हिसा मिळविण्यासाठी भारतीय पासपोर्ट धारकांना ‘एम्प्लॉयमेंट सर्टिफिकेट’ किंवा जपानला कशासाठी जात आहोत याचे विवरण देणारे एक पत्र द्यावे लागत असे. हा नियमही आता रद्द करण्यात आला आहे.
vis3
सौदी अरेबियाला जाण्यासाठी २५ वर्षे वयापुढील महिलांना, जर त्या एकट्याच प्रवास करणार असतील तर व्हिसा दिला जात नसे. पण आता या नियमांमध्ये बदल करण्यात आले असून, आता महिला एकट्याने प्रवास करणार असल्यासही तिला सौदी अरेबियाचा व्हिसा मिळण्याचे प्रावधान आहे. भारती विद्यार्थांना झिम्बाब्वे देशामध्ये ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तर भारतीय नागरिकांसाठी इज्राइलच्या व्हिसाच्या किंमतीमध्ये घट करण्यात आली असून, आता ११००-१७०० रुपयांपर्यंत व्हिसा फी भरावी लागत आहे. तसेच कझाक एअरलाइन्सने प्रवास करीत असल्यास भारतीय पासपोर्ट धारकांना कझाकिस्तानमध्ये ७२ तासांचा मोफत ट्रांझीट व्हिसा उपलब्ध करून देण्याची सोय आतापासून आहे.

Leave a Comment