
बेसबॉलचा निवृत्त खेळाडू एलेक्स रोड्रिगेजसोबत सुप्रसिद्ध अमेरिकन गायिका व अभिनेत्री जेनिफर लोपेजने साखरपुडा केला असून गत दोन वर्षांपासून जेनिफर व एलेक्स एकमेकांना डेट करत होते. दोघांनीही दोन वर्षांच्या डेटनंतर साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गत शनिवारी हा साखरपुडा पार पडला. जेनिफरचा हा सहावा साखरपुडा आहे.
सहाव्यांदा विवाहबद्ध होणार जेनिफर लोपेज
आपल्या सोशल अकाऊंटवर याबाबतची घोषणा जेनिफरने केली. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोत जेनिफरच्या बोटात अंगठी दिसत आहे. सारखपुड्याच्या बातमीला एलेक्सनेही दुजोरा दिला. त्याने ‘तिने होकार दिला,’ असे लिहित साखरपुड्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली.
जेनिफर व अॅलेक्स यांची पहिली भेट २००५ मध्ये झाली होती. ते पहिल्यांदा क्वींसच्या शिआ स्टेडिअमवर एकमेकांना भेटले होते. यापूर्वी जेनिफरने चार लग्न आणि १ साखरपुडा केला होता. जेनिफर लोपेज ही अमेरिकन गायिका, अभिनेत्री, निर्माता आहे. तिने आपल्या करिअरची इन लिव्हिंग कलर टेलिव्हिजन कॉमेडी शोमधून डान्सर म्हणून सुरुवात केली होती. यानंतर तिने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले. १९९९ मध्ये तिने आपला पहिला स्टुडिओ अल्बम रिलीज केला.
