तब्बल 220 वर्षांनी ब्रिटनाच्या एका तळघरात मिळाली टीपू सुलतानची शस्त्रास्त्रे

arms
म्हैसूरचा शासक टीपू सुलतान याची काही शस्त्रे ब्रिटनच्या एका परिवाराला त्यांच्या तळघरात सापडली आहेत. या वस्तूंचा लवकरच लिलाव केला जाणार आहे. ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीत या परिवाराचे पूर्वज मेजर थॉमस हार्ट एक सेना अधिकारी होते. काही कलाकृती आणि हत्यारे ते १७९८ ते ९९ मध्ये लढल्या गेलेल्या चौथ्या अॅंग्लो-म्हैसूर युद्धानंतर घरी घेऊन आले होते. त्यातीलच ही शस्त्रे आहेत.
arms1
या शस्त्रास्त्रांचा २६ मार्च रोजी लिलाव केला जाणार आहे. यात टीपू सुलतानच्या फ्लिंटलॉक गन आणि स्वर्णजडीत तलवारीसहीत आठ दुर्मिळ शस्त्रांचा समावेश आहे. टीपू सुलतानचा १७९९ मध्ये सेरिंगपटममध्ये युद्धादरम्यान मृत्यू झाला होता. ईस्ट इंडिया कंपनीचे मेजर थॉमस हार्ट यांनी त्यानंतर ही हत्यारे सोबत घेतली होती. तेव्हापासून वेगवेगळ्या पिढ्यांनी या वस्तू सांभाळून ठेवल्या होत्या. लिलाव ज्या शस्त्रांचा होणार आहे त्यात टीपू सुलतानची बंदूक आहे. त्यासोबतच त्याचे वडील हैदर अलीची सोन्याची तलवारही यात आहे. तसेच एका सुपारी ठेवण्याचा सोन्याचा डबाही आहे. यात अजूनही तीन सुपाऱ्या आहेत.
arms2
याबाबत माहिती देताना एंथनी क्रिब म्हणाले की, पैशांमध्ये त्यांना आणि त्यांच्या परिवाराला काहीच रस नाही. या वस्तू भारताला परत द्याव्यात असे त्यांना वाटते. कदाचित एखाद्या संग्रहालयाने हे विकत घ्यावेत. जेणेकरून येणारी पिढी यातून काही शिकू शकेल. जानेवारीमध्ये याबाबतचा खुलासा झाला होता. या परिवाराने तेव्हा तळघरात मिळालेल्या एका तलवारीची माहिती एंथनी क्रिब लिमिटेडला संपर्क केला होता.