अजब ‘कॅच’चा गजब व्हिडीओ

cricket
क्रिकेट या खेळाला जसे जंटलमन गेम म्हणून ओळखले जाते त्याचबरोबर या खेळाला अनिश्चिततेचा खेळ असे देखील म्हटले जाते. एखाद्या सामन्याचा शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत सामना कोणाच्या बाजूने झुकला हे सांगणे देखील कठिण असते. काळानुसार क्रिकेटच्या नियमांमध्ये झालेल्या बदलानंतर आपण अनेकदा अनेक प्रकारचे धावबाद किंवा झेल आपण पाहिले आहेत. सध्याच्या घडीला सोशल मीडियामध्ये महिला क्रिकेटमधील असाच एक अजब प्रकारचा झेल व्हायरल होत आहे.

हा अजब झेल घेतला गेला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामधील महिलांच्या सामन्यात. न्यूझीलंडचा महिला संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करत होता. त्यावेळी न्यूझीलंडची केटी पेरकिन्स ही चार धावांवर फलंदाजी करत होती. तिने हिथर ग्रॅहम हिच्या गोलंदाजीवर सरळ फटका खेळला. हा चेंडू थेट नॉन स्ट्राइकला असलेल्या मार्टिनच्या बॅटवर आदळला आणि चेंडू उडाला. त्यानंतर तो चेंडूला गोलंदाज ग्रॅहमने झेलला आणि झेलबाद झाल्याचे अपील केले.


यावेळी निर्णय काय द्यावा अशी पंचांची पंचाईत झाली. त्यानंतर त्यांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला. तिसऱ्या पंचांनी घटना नीट पाहून आणि त्याचा अभ्यास करून लगेचच पेरकिन्सला बाद ठरवले. दरम्यान, पंचांनीही दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हा प्रकार खिलाडूवृत्तीने स्वीकारला याबाबत त्यांचे कौतुक केले.

Leave a Comment