अकॅडमी अवॉर्ड्सच्या ट्रॉफीला ‘ऑस्कर’ का म्हटले जाते?

oscar
२०१३ सालापसून अकॅडमी अवॉर्ड्स सोहळा हा औपचारिक दृष्ट्या ‘ऑस्कर पुरस्कार समारोह’ म्हणून ओळखला जाऊ लागला. पण मुळात या समारोहामध्ये दिल्या जाणऱ्या पुतळ्याच्या ट्रॉफीला ‘ऑस्कर’ हे नाव पडले कसे याचा किस्सा मोठा रोचक आहे. तसेच यामागे अनेक कथा ही आहेत. यामागची सर्वमान्य थियरी अशी, की ‘अकॅडमी अवॉर्ड ऑफ मेरिट’ या नावने दिल्या जाणाऱ्या ट्रॉफीला ऑस्कर हे नाव दिले मार्गारेट हेरिक यांनी. मार्गारेट त्या काळी अकॅडमी अवॉर्ड लायब्रेरियन असून, त्यानंतर काही वर्षांनी त्यांची नियुक्ती ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस’ च्या निर्देशिका म्हणून झाली. हेरिक यांनी अकॅडमी पुरस्कार म्हणून दिली जाणारी ट्रॉफी जेव्हा १९३१ साली पहिल्यांदा पाहिली, तेव्हा तो पुतळा आपल्या अंकल ऑस्कर यांच्याप्रमाणे दिसत असल्याचे हेरिक यांनी म्हटले. तेव्हापासून या पुतळ्याचे नाव ऑस्कर पडले असल्याचे म्हटले जाते.
Oscars-2013
१९३४ साली या ट्रॉफीचा उल्लेख प्रथमच औपचारिक रित्या असा करण्यात आला असून, सुप्रसिद्ध लेखक सिडनी स्कोल्स्की यांनी या पुरस्कारासाठी हे नाव प्रथम वापरल्याचे काहींचे म्हणणे आहे. तर अनेकांच्या म्हणण्यानुसार १९३४ साली ‘थ्री लिटल पिग्ज’ या चित्रपटासाठी अकॅडमी पुरस्काराने सम्मानित केल्या गेलेल्या वॉल्ट डिजनी यांनी आपल्या हातातील ट्रॉफीचा उल्लेख सर्वप्रथम जाहीररित्या ‘ऑस्कर’ म्हणून केला होता. स्कोल्स्की यांनी या पुरस्काराचा केलेला ‘ऑस्कर’ असा उल्लेख उपहासाने केला असून, डिजनी यांनी या ट्रॉफीचा उल्लेख सर्वप्रथम जाहीररित्या ‘ऑस्कर’ म्हणून केल्यानंतर या उपाधीला सम्मान प्राप्त झाल्याचे म्हटले जाते. ऑस्कर पुरस्कार म्हणून दिली जाणारी ट्रॉफी ‘एमजीएम’चे निर्देशक सेड्रिक गिबन्स यांनी डिझाईन केली आहे.

Leave a Comment