
औरंगाबाद : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस २८ तारखेला विधानसभा बरखास्त करतील आणि राजीनामा देतील, त्यामुळे राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होतील, असा भाकीत वजा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी हे गुरुवारी औरंगाबामधील जाहीर सभेत बोलताना वक्तव्य केले आहे.
राजीनामा देऊन विधानसभा बरखास्त करणार मुख्यमंत्री फडणवीस
त्यांनी सहकारी पक्षांना आणि कार्यकर्त्यांना यावेळी त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांसोबत जागा वाटपाची बोलणी सुरु असून, मतांचं विभाजन होऊन भाजपाला फायदा होईल असे कोणतही काम करू नका, असा सल्लादेखील दिला आहे.
भाजप नेते भक्षक असून यांच्यापासून लोकांच्या पोरीबाळी काय सुरक्षित राहणार, असे म्हणत भाजपवालोंसे बेटी बचाव म्हणण्याची वेळ आल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली. गल्ली-बोळातील चौकीदार देशाच्या चौकीदारामुळे बदनाम झाले आहेत. पण हे गल्लीबोळातील चौकीदार चोर नाही तर देशाचा चौकीदारच चोर असल्याचे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. लोकशाहीत विरोधकांना कुत्र्या-मांजराची उपमा दिली जात असेल तर हीच कुत्रे-मांजर तुमच्या गळ्याचे लचके तोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राज्य सरकार २८ फेब्रुवारीला बरखास्त होऊन निवडणुकांची घोषणा होणार असल्यामुळे तयारीला लागा अशी सूचनाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिली. अबकी बार आपटी मार असे जनतेला आवाहन करतानाच भाजप सरकार सत्तेतून जात नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
