‘स्ट्रीट डान्सर ३’च्या नव्या पोस्टरमध्ये पहा वरूण आणि श्रद्धाची खास झलक

street-dancer
अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता वरूण धवनची जोडी पुन्हा एकदा ‘एबीसीडी २’ नंतर एकत्र झळकणार आहे. हे दोघेही ‘स्ट्रीट डान्स ३’ चित्रपटातून पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. वरूण आणि श्रद्धाची या चित्रपटातील खास झलक आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.


वरूण आणि श्रद्धाशिवाय चित्रपटात प्रभूदेवा आणि नोरा फतेही यांच्याही मुख्य भूमिका असणार आहेत. श्रद्धा आणि वरूणसोबतच प्रभूदेवाची खास झलकदेखील शेअर करण्यात आली आहे. वरूणने हे फोटो ‘देवा रे देवा आया प्रभूदेवा’ असे कॅप्शन देत शेअर केले आहेत.


डान्सवर आधारित हा चित्रपट असणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूझा करणार आहे. अमृतसरमध्ये काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली. हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘एबीसीडी २’नंतर प्रभूदेवा आणि वरूणचा अफलातून डान्स पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.

Leave a Comment